चिमुकल्या ने सोडवली वडिलांची दारू

मंगळवार, 11 जानेवारी 2022 (16:40 IST)
दारू मुळे अवघ्या आयुष्याची माती होते. दारूच्या व्यसनामुळे कित्येक घर मोडले आहे. दारूचे व्यसन फार वाईट आहे. घराचा मुख्य माणूसच त्याचा आहारी गेला तर घराचे सर्वनाश होणे निश्चितच आहेच. दारू सोडविण्यासाठी कुटुंबाचा प्रत्येक सदस्य काहीही प्रयत्न करतो. जेणे करून आपल्या माणसाला लागलेली ही दारू पिण्याची वाईट सवय दूर होवो. पण यवतमाळच्या चिमुकल्याने वडिलांनी दारू सोडावी या साठी जे केले आहे ते कौतुकास्पद आहे.यवतमाळच्या लोनबेहळ येथे राहणाऱ्या 13 वर्षाचा चिमुकला अंकुश राजू आडे याने आपल्या गावातील ग्रामसभेत त्याचे वडील राजू आडे यांनी दारू सोडावी अशी मागणी केली. अंकुश इयत्ता सातवीत शिकत असून घराची आर्थिक स्थिती बेताची असून वडिलांना दारू पिण्याच्या व्यसनामुळे घराची जबादारी सांभाळत भाजी विकण्याचे व्यवसाय करतो. तो आधी सकाळी गावापासून नऊ किलोमीटर दूर असलेल्या आर्णी तालुक्यातील भाजी मंडईतून भाजी विकत आणतो नंतर शाळेत जातो, शाळा सुटल्यावर भाजी विकण्याचे काम करतो. त्याच्या घरात आजी, आजोबा, 2 लहान भाऊ ,बहीण, आई असा परिवार आहे. त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन असून ते दारू पिऊन आईला मारहाण करतात .या मुळे त्याने घराची जबादारी स्वीकारली आहे. त्याने  दोन दिवसापूर्वी आपल्या गावात भरलेल्या ग्रामसभेत वडिलांनी दारू सोडावी अशी मागणी केली .परिणामी  ग्रामसभेने चिमुकल्याच्या वडिलांना उठबशा काढण्यास सांगितले आणि पुढे कधीही दारू प्यायची नाही असे बजावून सांगितले. राजू ने देखील आपल्या मुलाच्या खातीर कधीही दारू न पिण्याचे वचन दिले. चिमुकल्या अंकुशचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती