मुख्यमंत्रांनी पीयूषच्या गळ्यात हार घालत त्याच्या ठीवर कौतुकाची थाप दिली. लाखो विद्यार्थ्यांच टप्प्याने झालेल्या स्पर्धेतून अखेरच्या 447 यशस्वी विद्यार्थ्यांमध्येही पीयूष अग्रस्थानी राहिला. गतवर्षी हृदविकाराने पीयूषचे पितृछत्र हरपल्यानंतरही जिद्दीने अभ्यास करीत त्याने एनडीए परीक्षेत यश मिळविले आहे. पीयषने उच्च मध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या सर्व्हिस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूट येथून घेतले आहे. या यशानंतर नाशिक महापालिकेचवतीनेही महापौर रंजना भानसी व पदाधिकार्यांनी पीयूषचा त्याच्या राहत्या घरी जाऊन गौरव केला होता.