विजयदादा म्हणाले, 'मी राष्ट्रवादीतच'

गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (16:55 IST)
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत दबदबा असलेल्या अकलूज च्या मोहिते-पाटील कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला होता. आता मोहिते-पाटील कुटुंबप्रमुख माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी 'आपण राष्ट्रवादीतच' असल्याचे म्हणत भाजपला 'दे धक्का' दिला आहे.
पुण्याजवळील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी विजदादा आले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा आोजिली होती. मात्र मख्यमंत्री येण्यापूर्वीच राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार हे दाखल झाले होते. त्यानंतर विजदादा आणि हर्षवर्धन पाटील हे तेथे आले. पवार यांनी विजदादांना आपल्या समवेत बसण्यास सांगितले. पवार आणि मोहिते-पाटील यच्यात सुमारे पंधरा मिनिटे गुफ्तगू झाले. परंतु ते काय बोलले हे गुलदस्त्यात राहिले. त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांच्या शेजारी बसून बोलत होते. त्याबद्दल गूढ निर्माण झाले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीच्यावेळी विजदादांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये दाखल झाले. त्यावेळी विजदादांनी अधिकृत घोषणा केली नसली तरी ते भाजपच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दिसून येत होते. त्यांची राष्ट्रवादीबद्दलची भूमिकाही अस्पष्टच होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील सभेच्या निमित्ताने पवार-मोहिते-पाटील यांच्यात काय हितगुज झाले हे समजू शकले नाही. मात्र 'आपण राष्ट्रवादीतच' असे माध्यमांना सांगत विजदादांनी भाजपला धक्का दिल्याचे मानले जात आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती