छत्रपती शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट
सोमवार, 10 जून 2024 (20:57 IST)
social media
कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.ते कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातून निवडून आले आहे. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आणि पक्षाचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांची दिल्लीत भेट घेतली. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांची भेट झाली. शाहू महाराज यांच्याबरोबर यावेळी कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील हे देखिल उपस्थित होते.
महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
कोल्हापूरचा मतदारसंघ पारंपरिकपणे शिवसेनेचा मतदारसंघ होता. पण शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय झाल्यानंतर शिवसेनेनं त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला होता.कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या प्रचारसभेलाही उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित राहिले होते.
आज मातोश्री येथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली या वेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी आमदार मालोजीराजे हे उपस्थित होते.