चंदू चव्‍हाणला भारतात आणण्‍यासाठी केंद्राचा प्रयत्‍न

मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (08:57 IST)
पाकच्‍या ताब्‍यात असलेला भारतीय जवान चंदू चव्‍हाण याला भारतात परत आणण्‍यासाठी आता केंद्र सरकार प्रयत्‍न करणार आहे. आतापर्यंत केवळ डीजीएमओकडून चंदू चव्‍हाण याला भारतात आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू होते. पण आता केंद्रानेही तसे प्रयत्‍न चालविले असून भारत सरकार पाकिस्‍तान परराष्‍ट्र मंत्रालयास पत्र लिहणार आहे. 
 
२९ सप्‍टेंबरला भारताने पाकच्‍या हद्‍दीत घुसून सर्जिकल स्‍ट्राईक केले होते. त्‍याचदिवशी अनावधानाने भारतीय जवान चंदू चव्‍हाण हा पाकच्‍या हद्‍दीत गेला होता. यावेळी पाक सैनिकांनी चंदूला ताब्‍यात घेतले आहे. तेंव्‍हापासून आजतागायत चंदू चव्‍हाण हा जवान पाकच्‍या ताब्‍यात आहे. त्‍याला सोडविण्‍यासाठी आता केंद्र सरकार प्रयत्‍न करणार आहे. 
 
चंदू चव्‍हाण हा महाराष्‍ट्रातील धुळ्‍याचा रहिवासी आहे. २९ सप्‍टेंबरपासून तो पाकच्‍या ताब्‍यात असल्‍याने त्‍याच्‍या घरच्‍यांना चिंता लागली आहे. चंदू याचा भाऊ भूषण हा ही सैन्‍यात आहे. 

वेबदुनिया वर वाचा