लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा

नवसाला पावणारा आणि  मुंबई सोबत राज्य आणि देशात सर्वांचे श्रध्दास्थान असलेला लालबागच्या राजाने अखेर पहिले दर्शन सर्वाना दिले आहे. त्यात विशेष म्हणजे  राजाने  दर्शन  देताना  चांद्रयान  दोन  चे  देखील दर्शन घडवले आहे. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला असून भक्त यामुळे आनंदीत झाले आहे. 
 
मुंबईचा लोकप्रिय लालबागचा राजाचं मुखदर्शन आज करण्यात आलं. यंदाच्या वर्षी लालबागचा राजा विराजमान झाला आहे तोच मुळी चांद्रभूमीवर. राजाच्या सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाचा देखावा भारताची अंतराळ संशोधन संस्था 'इस्त्रो' च्या कार्य कर्तुत्वाला सलाम करणारा साकारला आहे. 
 
दर वर्षी लालबागचा राजा नव नवीन देखावे करत असतो. गणेश उत्सव काळात या ठिकाणी दर्शनाला लाखो भाविक येतात तर अनेक राजकारणी आणि सेलेब्रिटी देखील आपली हजेरी लावत असतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती