पाऊस पुन्हा सक्रिय होणार, हवामान खात्याचा अंदाज

शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (16:00 IST)
पुढील काही दिवसांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासह पाऊसही राज्यभरात विविध भागात दमदार हजेरी लावणार आहे. यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राचे काही भाग, उत्तर मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भाचा समावेश असणार आहे.
 
मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या 2 सप्टेंबर पासून तुरळक सुरू झालेला पाऊस 5 सप्टेंबरपासून पुन्हा जोमाने बरसू लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये कमी पावसाची स्थिती जैसे थे राहू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, 2 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रात वाहणारे पश्चिम दिशेचे वारे यांमुळे वातावरणात पुन्हा बदल होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती