चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,ही कौटुंबिक भेट होती, राज आमच्या मोठ्या भावासारखे आहेत

मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (15:05 IST)
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या विधानावरून चर्चा सुरू झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी आज राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 
 
यावेळी माध्यमांनी भेटीचं कारण विचारलं असता ही कौटुंबिक भेट होती, असं ते म्हणाले. “मी फक्त राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलोय. याचा राजकीय अर्थ नाहीये. ते आमच्या मोठ्या भावासारखे आहेत. राज ठाकरेंनी आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात नेहमीच हजेरी लावली आहे. त्या दृष्टीने एक कौटुंबीक भेट घेण्यासाठी मी इथे आलो”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
 
“राज ठाकरे जेव्हापासून राजकारणात आले, तेव्हापासून ते महाराष्ट्र आणि हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. राज ठाकरेंचा मूळचा स्वभावच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे आज त्यांना आम्ही नव्याने भेटत आहोत असं काहीही नाही. त्यांना भेटण्यात काहीही गैर नाही”, असंही बावनकुळेंनी नमूद केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती