मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (16:10 IST)
मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत असून काही ठिकाणी पूर आला आहे. लातूर आणि नांदेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. तर परभणीला पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, मराठवाडा, पश्चिम विदर्भात पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज आहे.
 
तर ठाणे, मुंबई या ठिकाणी आकाश ढगाळले राहिले. तर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी येथे  पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात तुरळक पाऊस पडत आहे. 
 
कोकणात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. दरम्यान  नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहर आणि तालुक्यात रात्री तुफान पाऊस झाला तर काही भागात अतिवृष्टी झाली. नाल्या लगत असलेल्या स्मशान भूमीत पाणी शिरल्याने तिनी भागाच्या संरक्षण भिंती कोसळल्या. मुखेड शहरात १३३ मिलिमीटर तर तालुक्यात सरासरी ९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती