सरकारी नौकरी मिळविण्याची सुवर्ण संधी, कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट भरती होणार

सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (11:28 IST)
सरकारी नौकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सुवर्ण संधी आहे. स्टील ऑथॅरिटी ऑफ इंडियाने बऱ्याच पदांवर भरती करण्यासाठीचे अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. इथे आपणांस सांगू इच्छितो आहोत की या पदांसाठी केवळ पात्र असलेल्या नर्सच आवेदन करू शकतात. दुर्गापूर स्टील प्लांट च्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
 
महत्वाच्या तारख्या -
आवेदन करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2020
 
पदाचे नाव आणि संख्या - 
प्रॉफिशिएंसी ट्रेनी (प्रवीण प्रशिक्षु) - 82 पद 
 
वयोगट - 
या भरतीसाठी अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 30 वर्ष निश्चित केली आहे.
 
प्रशिक्षणाची शेवटची मुदत - 
18 महिने 
कामाचे तास -
दररोज फक्त 8 तास. आठवड्यातून कोणत्याही एका दिवशी साप्ताहिक सुट्टी देखील दिली जाणार आहे.
 
पगार - 
दरमहिना 8 हजार महिना.
 
शैक्षणिक पात्रता -
या भरती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी उमेदवाराकडे बीएससी(नर्सिंग)ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच इंटर्नशिप प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
 
अर्ज कसे करावे - 
अर्जाची प्रक्रियेला जाणून घेण्यासाठी उमेदवारांना विभागाकडून दिलेल्या अधिकृत सूचनांना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
 
निवड प्रक्रिया -
मुलाखतीच्या माध्यमातून.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती