एचसीएल १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार

गुरूवार, 23 जुलै 2020 (08:57 IST)
करोना काळात एचसीएल टेक्नॉलॉजीनं १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी कंपनीनं ९ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६ हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. 
 
१७ जून रोजी एचसीएल टेक्नॉलॉजीनं आपला तिमाहिचा रिझल्ट जाहीर केला होता. जून तिमाहित कंपनीचा नफा ३१.७० टक्क्यांनी वाढून तो २ हजार ९२५ कोटी रूपये झाला होता. कंपनीला गेल्या वर्षी याच तिमाहित २ हजार २२० कोटी रूपयांचा नफा झाला होता. तर दुसरीकडे यानंतर कंपनीचे शेअर्सनंही ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
 
एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या अध्यक्षपदी संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या रोशनी नाडर-मलहोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८.९ अब्ज डॉलरच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध तंत्रज्ञान कं पनीचे नेतृत्व करणाऱ्या रोशनी या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अब्जाधीश, तरुण उद्योजक, महिला व्यावसायिकांच्या यादीत त्यांची अव्वल म्हणून नोंद झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती