केंद्र सरकारकडून शरद पवार यांना पद्म पुरस्कार दिला सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

मंगळवार, 18 जानेवारी 2022 (08:12 IST)
खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करताना, हे विसरले की त्यांच्याच केंद्र सरकारकडून शरद पवार यांना पद्म पुरस्कार दिला होता. सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना खोचक शब्दात टोला लगावला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील अनेक दिवसांपासून सक्रिय नसल्यामुळे कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कुणाला तरी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येते. त्यावरही सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केलं. कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक परदेशात झाले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. असं असताना मुख्यमंत्री बदलण्याची जी काही मागणी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती