नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिरजू महाराज यांना श्रद्धांजली

सोमवार, 17 जानेवारी 2022 (15:47 IST)
कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराज म्हणजे नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांचे नृत्य आणि संगीत क्षेत्रातील योगदान अमूल्य असे आहे. त्यांनी भारतीय कलेचे वैभव सातासमुद्रापार नेले. कला क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा मानदंड निर्माण केला. नृत्य, संगीत हेच त्यांचे आयुष्य होते. ते सर्जक कला उपासक होते. त्यांचे कलारसिकांच्या हृदयातील स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहील. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना विनम्र श्रध्दांजली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती