सध्या देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉन ने हैराण केले असता आता या नंतर कोरोनाच्या औषधांचा तुटवडा शासकीय रुग्णालयात होत आहे. शासकीय रुग्णालयात कोरोनाची औषधे मिळत नसल्याचे रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे बाहेरून आणण्याची वेळ आली आहे. शासकीय रुग्णालयात बिले थकल्याने औषधांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. औषधांची पुरवणी केल्यावर देखील हाफकीन संस्थेकडे अजून सुमारे 90 कोटींची थकबाकी आहे. उर्वरित थकबाकी मिळाल्या शिवाय औषध पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा औषध पुरवठादारांनी दिला आहे.