एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत भाजपा आंदोलकांना शिधा पुरवणार - चंद्रकांत पाटील

सोमवार, 17 जानेवारी 2022 (09:17 IST)
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजप घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला.
हा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील यांनी संपात उतरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संप सुरू असेपर्यंत शिधा देण्याची जबाबदारी भाजपा घेत असल्याचे घोषित केलं.
 
हा संप लवकरच संपुष्टात यावा, कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानाने कामावर जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती