कल्याणीनगर भागातील एका हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे . याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नवारी हलधर सिंग (वय 38, रा. हरिनगर, वडगाव शेरी-कल्याणीनगर रोड) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.