माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोन माजी मन्त्रींच्या जागी 5 नवे आमदार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे मंत्रिपदाचे दावेदार भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक,अर्जुन खोतकर, विजय शिवतारे इत्यादि मंत्र्यांचा या यादीत समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील एकूण 43 आमदार मंत्री होऊ शकतात.