बोधगया येथे विविध देशांनी स्तूप आणि गौतम बुद्ध यांच्या अप्रतिम मूर्ती साकारल्या आहेत. त्याच धर्तीवर अजिंठा-वेरुळमध्ये जगभरातील बौद्ध संस्कृतीचे दर्शन बुद्ध थीम पार्कमध्ये घडू शकेल. येत्या सहा महिन्यांत या प्रकल्पाची उभारणी सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असे लोढा यांनी सांगितले.
कार्लाजवळ चाणक्य संग्रहालय
लोणावळाजवळ असलेल्या कार्ला लेणी परिसरात एमटीडीसीच्या जागेवर चाणक्य थीम पार्क उभारले जाईल. आर्य चाणक्यांच्या पाच सिद्धांतांवर आधारित हा पार्क असेल.
मुंबई महोत्सव नोव्हेंबरमध्ये
मुंबईच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडविणाऱ्या मुंबई महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबरमध्ये पर्यटन विभाग करणार आहे. जून-जुलैमध्ये कोकणात कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor