मिळालेल्या माहितीनुसार, एकलासपूर येथील गजानन मुळे यांच्या कडे विहीर खोल करण्याचे काम सुरु होते. या कामात सुमारे पाच ते सहा मजूर लागलेले होते. त्यापैकी तिघे जण विहिरीच्या आत काम करत होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक विहिरीचा काही भाग खचून कोसळला आणि त्यामध्ये दोन मजूर ढिगाऱ्याखाली दाबले गेले आणि त्यांचा त्यात अडकून मृत्यू झाला. आणि एक मजूर जखमी झाला . शेख अखतर शेख दादू असे या जखमी झालेल्या मजुराचे नाव असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.