जंगलातील जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघ, बिबट्या, हरिण, नीलगाय, रेनडिअर, कोल्हा इत्यादी वन्यजीव पाहायला मिळतात.
येत्या नवीन वर्षात देखील पर्यटकांना या जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. वनविभागाकडून पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी पर्यटकांना आता बोटिंगचा आनंद देखील घेता येणार आहे. नवीन वर्षात बोटिंग सफारी सुरु होण्याचे संकेत मिळाले आहे. या साठी महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डा मार्फ़त (MEDB) पर्यटनासाठी अडीच कोटी रुपयांची सर्वसमावेशक योजना शासनाकडे सादर करण्यात आली आहे.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या 2 बोटी, प्रति बोट दररोज 2 सहली अशा एकूण 4 सहली केल्या जाणार आहेत. सकाळी व दुपारी कोलितमारा ते नवेगाव खैरी मार्गे कुवरा भिवसेन या सुमारे २३ किमी लांबीच्या मार्गावर पर्यटक जल पर्यटनाचा आनंद लुटतील. यास सुमारे 2.5 तास लागतील.
एका बोटीत 24 पर्यटक बसू शकतात. याअंतर्गत दररोज एकूण 96 पर्यटकांना बोटिंग सफारीचा आनंद घेता येणार आहे. बोटिंग सफारीसाठी प्रति पर्यटक 1,500 रुपये तिकीट शुल्क आकारले जाईल. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.