कोरोनाच्या काळात दुसऱ्या देशांना लसी देऊन भाजपने हत्याकांड घडवलं. त्यांनी हे पाप केलं आहे. त्यामुळे कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले त्यांची जाहीर माफी मागा,असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.बुलढाण्यात नाना पटोले बोलत होते.
कोरोनामुळे एकाच कुटुंबातील अनेक लोकांचे जीव गेले.आर्थिकरित्या कमजोर झाले. यामुळे पंतप्रधानांनी देशाची जाहीर मागावी,अशी मागणी नाना पटोले यांनी केली.तसंच पुढे बोलताना नाना पटोले यांनी हे जे कृत्य झाले ते म्हणजे जालियनवाला हत्याकांड प्रमाणे झाल्याचा आरोप केला. केंद्राची चुक आहे. भाजपने हे हत्याकांड घडवलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
धर्माच्या आधारावर जे काही राजकारण होत आहे यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली. तिथे धर्माच्या आधारावर राजकारण चालतं.भारतात असं होत नाही.मात्र, ७५ वर्षानंतर आता धर्माच्या नावावर राजकारण करण्याचं काम काही लोक करत आहेत.त्यांचा चेहरा आता समोर आला आहे, असं नाना पटोले म्हणाले.