लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता अडकला आहे का? खात्यात १५०० रुपये कधी येणार हे मंत्र्यांनी सांगितले

शुक्रवार, 2 मे 2025 (08:30 IST)
Ladki Bahini Yojana:  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी आहे. कोट्यवधी महिलांची प्रतीक्षा लवकरच संपू शकते.
ALSO READ: महाराष्ट्र सरकार प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास विभागात प्रथम क्रमांकावर
महाराष्ट्रातील कोट्यवधी लाभार्थी महिला एप्रिल महिन्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. एप्रिल महिन्याची रक्कम ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ही रक्कम अजून खात्यात आलेली नाही. अलिकडेच, महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते की एप्रिल महिन्याची रक्कम एप्रिल महिना संपण्यापूर्वी लाडक्या बहिणींना दिली जाईल. पण ते घडले नाही. आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. महिला आणि बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेची रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि लवकरच हे पैसे लाडक्या बहिणींना पाठवले जातील.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती