भीम आर्मीचे अशोक कांबळे यांना अटक

रविवार, 1 मे 2022 (17:51 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज संध्याकाळी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधले आहे. भीम आर्मीने  देखील या सभेत उपस्थित राहण्याचा इशारा दिला होता. त्या साठी भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबाद जाणार होते. भीम आर्मीचे महासचिव यांनी राजठाकरे यांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. ते आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईवरून औरंगाबादच्या दिशेने निघाले असता घाट कोपर पश्चिम चिराग नगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. भीम आर्मीचे पदाधिकारी राज ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट देण्याचे सांगितले जात आहे. भीम आर्मीने राज ठाकरे यांनी पोलिसांनी घातलेल्या अटींचे पालन न केल्यास त्यांची सभा उधळून लावण्याचे संकेत दिले होते. या साठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती