जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यात निष्पाप हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी भंडारा शहर बंद ठेवण्यात आले. सकल हिंदू समाज भंडारा नगरच्या वतीने बंद व भव्य जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता जलाराम मंगल कार्यालयापासून हा मोर्चा सुरू झाला
जलाराम मंगल कार्यालयापासून सुरू झालेला निषेध मोर्चा गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, डॉ. गवळी चौक मार्गे नगर परिषदेसमोरील गांधी चौकात पोहोचला. गांधी चौकातील निषेधाचे रूपांतर श्रद्धांजली सभेत झाले जिथे उपस्थित हजारो नागरिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 27 हिंदू यात्रेकरूंना मोबाईल टॉर्च पेटवून मूक श्रद्धांजली वाहिली.
या मोर्चात भंडारा शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.या दुःखात सहभागी होण्यासाठी शहरातील सर्व व्यावसायिक बांधवांनी दुपारी 4 नंतर स्वेच्छेने त्यांचे आस्थापने बंद ठेवले.
सकल हिंदू समाज भंडारा नगरच्या वतीने सांगण्यात आले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय हेतूने आयोजित करण्यात आला नव्हता, तर देशातील वाढत्या जिहादी दहशतवादाच्या विरोधात आणि निष्पाप हिंदू यात्रेकरूंना न्याय मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.