धर्मामुळे माणूस राक्षस नाही तर देव होण्याच्या मार्गानेच जातो : भागवत

शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (16:46 IST)
माणसाचा स्वभाव असा आहे की तो प्रसंगी राक्षसही होऊ शकतो. मात्र धर्माच्या मार्गाने गेल्यास तो राक्षस होण्याच्या नाही तर देव होण्याच्या मार्गाने जातो असे  सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 
 
विविधेत एकता असे म्हटले जाते मात्र आपल्याकडे एकतेतच विविधता आहे. एकतेची विविध रूपे आहेत त्यांचे स्वागत करा. भांडण करु नका. शाश्र्वत धर्माचा धागा हा सर्व रूपाने आत्म्याचे काम करतो. पाया तोच असतो इमारत वेगळी असते. घराचे रूप बदलते पाया बदलत नाही तसेच देशाचे आहे. अध्यात्म म्हणून जे जे आपल्या देशात बोलले गेले आहे ते प्रत्यक्ष पाहिलेले माहात्मे आपल्याला मिळाले आहेत. कबीर महाराज म्हणाचे कागज लेखी, मै कहता हूँ आँखन देखी. ही आँखन देखीची परंपराही आपल्याकडे कायम आहे असेही भागवत यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती