असे म्हणतात की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक उर्जेचा प्रभाव अधिक असतो. म्हणून या दिवशी पूजा, जप-तप करणे खूप शुभ मानले गेले आहे. ज्योतिष्यांप्रमाणे काही कार्य या दिवशी करणे टाळावा कारण काही कामांचे विपरित परिणाम हाती लागू शकतात.
अमावस्येच्या रात्री स्मशान घाटाच्या जवळपास भटकू नये.
या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी शारीरिक संबंध स्थापित करू नये. मौनी अमावस्येच्या दिवशी यौन संबंध ठेवल्याने जन्माला येणार्या संतानला जीवनभर कष्ट सहन करावे लागू शकतात.
असे म्हटलं जातं की या दिवशी वड, मेंदी आणि पिंपळाच्या झाडाखालून जाणे टाळावे. मान्यता आहे की या दिवशी झाडांवर आत्म्यांचा वास असतो आणि अमावस्येच्या दिवशी त्या अजून शक्तिशाली होऊन जातात. म्हणून झाडांच्या खालून जाऊ नये.