अमावास्येला अनेक लोकं घाबरतात आणि कोणतेही चांगले काम या दिवशी करणे टाळतात. अशात प्रश्न हा निर्माण होतो की अमावास्येला असं काय करावं की हा दिवस शुभ दिवस म्हणून व्यतीत झाला पाहिजे. तर उत्तर अगदी सोपं आहे की या दिवशी पूजा-पाठ, आराधना करून वेळ घालवावा. याने नकारात्मकता दूर होते आणि देवाची आपल्या कृपा राहते. तर आज काही सोपे असेच उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत जे अमावास्येला केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील. आर्थिक चणचण दूर होईल. धनासंबंधी समस्या नाहीश्या होतील आणि प्रत्येक कामा यश मिळू लागेल. तर जाणून घ्या उपाय:
* अमावास्येला घरात कापूर जाळावा याने नकारात्मकता दूर होते.
* या दिवशी कृष्ण मंदिराच्या डोम पिवळा ध्वज लावायला पाहिजे. याने सर्व अडथळे दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग दिसू लागतो.
* या दिवशी शनी देवाची पूजा करण्याचे देखील महत्त्व आहे. या दिवशी शनी मंदिरात निळे फुलं, काळे तीळ आणि अख्खी काळी उडीद डाळ, तिळाचे तेल, काजळ आणि काला कपडा अर्पित करावा. मंदिरात बसून शनी मंत्राची एक माळ जपावी.