बाप्परे, मित्राच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (21:52 IST)
धुळे जिल्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने मित्राच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा हजार रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात तब्बल एक लाख 60 हजार रुपयांची रक्कम वसुलीसाठी त्या विद्यार्थ्याकडे तगादा लावला गेला होता.  
 
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात राहणारा विश्वजीत राठोड (१७) या 1 विद्यार्थ्यांने आपल्या भाग्येश या मित्राकडून 15 हजार रुपये व्याजाने घेतले होते. या 15 हजारांच्या व्याजाच्या मोबदल्यात विश्वजीत कडून तब्बल एक लाख 60 हजार रुपयांची रक्कम चक्रवाढ पद्धतीने व्याजासह मागितली जात होती. व्याजाची रक्कम देण्यासाठी विश्वजीतने स्वतःच्या घरात चोरी केली. आईची आठ ग्रॅम सोन्याची अंगठी सोनाराला विकली आणि ते पैसे त्याने भाग्येश भावसारला दिले. इतकं दिल्यानंतरही भावसारची व्याजाची मोह काही सुटत नव्हती. भाग्येशने विश्वजीतकडे अतिरिक्त पैशाची मागणी सुरूच ठेवली. इतकंच नाही तर 26 जानेवारी रोजी भाग्येश भावसार आणि त्याचं कुटुंबीय विश्वजीतच्या घरी पोहोचलं. विश्वजीतच्या कुटुंबीयांशी त्यांनी भांडण केलं. विश्वजीतच्या कुटुंबियांनी त्यांची समजूत घातली, पण आम्हाला आमच्या व्याजाची रक्कम हवी, असा तगादा त्यांनी लावला आणि याच मानसिक तणावात विश्वजीतने तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली
 
 या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यामध्ये सावकारीची रक्कम मागणाऱ्या भाग्येश भावसार, शेखर भावसार आणि भाग्येशच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती