अभिनेत्रीची मेकअप रूममध्ये आत्महत्या, इन्स्टाग्रामवर लिहिली 'ही' शेवटची पोस्ट

रविवार, 25 डिसेंबर 2022 (10:29 IST)
सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री तुनिशा शर्मा हिनं 24 डिसेंबर आत्महत्या केली. तुनिशा शर्मा सध्या सोनी सब टीव्हीवरील 'अलिबाबा : दास्तान ए काबुल' नामक मालिकेत मुख्य भूमिका करत होती. मालिकेचं चित्रिकरण वसईत सुरू असताना, मेकअप रूममध्ये तुनिशानं आत्महत्येचं पाऊल उचललं.
 
तुनिशा बराच वेळ मेकअप रूमच्या बाहेर न आल्यानं इतर सहकाऱ्यानं मेकअप रूमच्या दिशेनं धाव घेतली.
वसईतील वाळीव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, "अभिनेत्री तुनिशा शर्मा मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान ब्रेकमध्ये मेकअप रूममध्ये गेली होती. अपेक्षित वेळेत तुनिशा मेकअप रूममधून बाहेर आली नाही. त्यामुळे काहीजण तिला बोलावण्यासाठी गेले असता, तिने दरवाजा उघडला नाही. मग दरवाजा तोडण्यात आलं. तर तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं.
 
"मग सेटवरीलच काहीजणांनी तुनिशाला तातडीनं, संध्याकाळी सव्वा चार-साडेचार वाजण्याच्या दरम्यान, हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र, हॉस्पिटलमध्ये आणण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता."
 
तुनिशानं शेवटच्या पोस्टमध्ये म्हटलंय...
अभिनेत्री तुनिशा शर्मानं आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबत एक वाक्यही लिहिलं आहे.
 
या फोटोत तुनिशाच्या हातात कुठलेतरी दिसत आहे. तिने या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की - "स्वत:च्या जिद्दीनं काम करणारे कधीच थांबत नाहीत..."
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

 
या पोस्टखाली आता तुनिशाच्या चाहत्यांकडून आदरांजली वाहण्यात येतेय.
 
तुनिशाचा अल्पपरिचय
तुनिशा शर्मा 20 वर्षांची होती.
 
तुनिशा शर्मा हिंदी टीव्ही मालिका आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनय करत असे.
 
2016 साली प्रदर्शित झालेल्या 'फितूर' सिनेमातून तुनिशानं या क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
 
अभिनेत्री विद्या बालनसोबत तुनिशानं 'कहानी 2' सिनेमातही काम केलं होतं.
टीव्ही मालिकांमध्ये तर ती एव्हाना नावाजलेला चेहरा बनली होती. इंटरनेटवाला लव्ह, इश्क सुबाल्लाह, गायब आणि शेर-ए-पंजाब : महाराजा रणजित सिंह यांसारख्या मालिकांमध्ये तुनिशानं काम केलं होतं.
 
'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप' या मालिकेतही तुनिशानं काम केलं होतं.
 
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
 
* हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
* सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
* इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
* नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
* विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती