एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही लोकांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला असे आमिष दाखवले होते की जर त्याने त्यांना 5 कोटी रुपये दिले तर ते त्याला 6 कोटी रुपये देतील. पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीवरून कारवाई करताना, मंगळवारी तुमसर परिसरातील इंदिरा नगर येथील एका ड्राय क्लीनिंग दुकानावर एका पथकाने छापा टाकला आणि एका बॉक्समध्ये ठेवलेले 5 कोटी रुपये जप्त केले. व आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.