Badalapur : रिक्षावर फणा काढून नाग बसला, व्हिडीओ व्हायरल

सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (14:12 IST)
Badlapur: साप हे नाव समोर आले तरीही अंगावर काटा येतो. प्रत्यक्षात जर साप किव्हा नाग समोर आला तर पायाखालची जमीनच सरकते.सध्या मान्सून ने माघारी घेतल्यामुळे साप कमीच आढळतात . सहसा वर्दळीच्या ठिकाणी साप आढळत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये नाग एका रिक्षावर फणा काढून बसललेला दिसत आहे. 

 हा व्हिडीओ बदलापूर रेल्वे स्थानकाचा  असून हा व्हिडीओ सोशलमिडीयावर टाकला आहे. या मध्ये बदलापूरच्या रेल्वे स्थानकाच्या खिडकी जवळचा हा व्हिडीओ आहे. साप रिक्षाचा मागे असून तो रिक्षाच्या छतावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. 

हा व्हिडीओ 12 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. साप ला अचानक पाहून लोकांची तारांबळ उडाली. या व्हिडिओला हजारो व्युज मिळाले असून नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 
 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती