मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेनी केली लावणी Viral Video
गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (15:28 IST)
Mumbai Local Train Viral Video मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे त्यांची जीवनरेषा. दररोज हजारोच्या संख्येने लोकं लोकलने प्रवास करतात. लोकल हा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा मुख्य भाग आहे.
अशात मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना काढलेले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अलीकडे असाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नऊवारी नेसलेली महिला चक्क लोकल ट्रेनमध्ये लावणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला लोकलमध्ये लावणी करताना दिसत आहे. rupamore77 या इन्स्टग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.