Shahrukhs fans शाहरुखच्या फॅन्सचा थिएटरमध्ये राडा

शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (11:33 IST)
जवान पाहण्यासाठी शाहरुखचे फॅन्स अजूनही थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. शाहरुखचा जवान रिलीज होऊन एक महिना झालात तरीही जवानची क्रेझ कमी झाली नाही, याचा अनुभव नुकताच आलाय. नाशिकच्या मालेगावमध्ये जवान पाहायला गेलेल्या फॅन्सनी थिएटरमध्ये फटाके फोडल्याची घटना घडलीय. काय झालंय पाहा. जवान पाहायला गेलेल्या फॅन्सचा थिएटरमध्ये धिंगाणा नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांनी सिनेमागृहात स्ट्रिंग बॉम्ब फोडला. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा शेवटचा शो काल मालेगावच्या कमलदीप थिएटरमध्ये पार पडला. 
 
 शाहरुख खानच्या चाहत्यांचा अतिउत्साह पाहून पोलिसांनी कारवाई केली आहे. चालू शोमध्ये थिएटरमध्ये फॅन्सचा धिंगाणा सार्वजनिक ठिकाणी आणि सिनेमा हॉलमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि फटाक्यांवर बंदी असतानाही, थिएटरमध्ये शाहरुख खानचा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांकडे स्ट्रिंग बॉम्ब आणि फटाके आढळून आले. त्याचा थेट सिनेमातही वापर केला. चित्रपटगृहासमोर फटाक्यांच्या अचानक स्फोटामुळे मोठा आवाज झाला आणि चित्रपट पाहण्यात मग्न असलेल्या प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. या घटनेनंतर लगेचच चित्रपटाचा शेवटचा शो मध्यभागी थांबवण्यात आला. जवानची कमाई सुसाट पहिल्या आठवड्यात 'जवान'ची एकूण कमाई 389.88 कोटी रुपये होती, तर दुसऱ्या आठवड्यात 136.1 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने 7.6 कोटींची कमाई केली आहे. तर रिलिजच्या 21व्या दिवशी चित्रपटाने 5.15 करोडची कमाई केली आहे. यासोबत आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण 614 कोटींचा टप्पा गाठला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती