किल्ले रायगडावर बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थी विसर्जनाचा घाट? मराठा सेवक समितीचा आरोप

शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (07:42 IST)
किल्ले रायगडावरील शिव समाधीसमोर बुधवारी दुपारी राखसदृष्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यावरून वाद झाला. मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना उघडकीस आणली.
 
काही लोक पुस्तक पूजनाच्या नावाखाली बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचं किल्ले रायगडावर विसर्जन करीत असल्याचा, त्याचप्रमाणे ही राख चंदन आणि अत्तरामध्ये भिजवून शिव समाधीला लावत असल्याचा आरोप पूजा झोळे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे पुस्तक आणि राखसदृष्य पावडर जप्त केलं असून हे पावडर केमिकल अ‍ॅनालिसिससाठी पाठवलं आहे. शिवप्रेमींनी समाधीस्थळावर निर्माण झालेल्या या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती