सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निवडीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय सुनावला. यावेळी न्यायालयाने निर्देश दिले की, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि न्यायाधीश यांच्या समितीच्या सल्ल्यानुसार करावी. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेशील स्वागत केले आहे.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत, "निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नवा कायदा होईपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करते. लोकशाही संस्थांची स्वायत्तता टिकायलाच हवी." अशा भावना व्यक्त केल्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor