अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर

मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (21:01 IST)
नाशिक : राज ठाकरे यांनी नाशिकची जबाबदारी अमित ठाकरेंवर दिली असल्याने ते नाशिकमध्ये सक्रिय झाले आहेत.आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर ते येत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटन मजबूत करण्यासह आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे.
अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर! पदाधिकारी, शाखाध्यक्षांशी प्रभागानुसार करणार चर्चामंगळवारी (दि.28) त्यांचे आगमन होणार असून बुधवार पर्यंत ते नाशिक मध्ये मुक्काम करणार आहे. यामध्ये ते प्रभागनिहाय बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची वन टू वन चर्चा करणार आहे.
पक्षाच्या मुख्यालय असलेल्या राजगड कार्यालयावर सर्व बैठका होणार आहे अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी तसेच मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रभागरचनेचा घोळ आणि ओबीसी आरक्षणामुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुण्यापाठोपाठ नाशिकच्या गढीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. नाशिक हा मनसेचा गड होता.
तीन आमदार, पालिकेची सत्ता नाशिककरांनी ठाकरेंकडे सोपवली होती. परंतु, स्थानिक नेत्यांमधील विसंवादामुळे आणि मार्केटिंगअभावी मनसेला आपला गड गमवावा लागला होता. मनसेकडून भाजपकडे गेलेला हा गड परत मिळविण्यासाठी ठाकरे पिता-पुत्रांनी शक्ती पणाला लावली आहे.
 
राज यांनी युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी दिली असून, अमित यांनी नाशिकमधील दौरे वाढवले होते. परंतु, निवडणुका लांबल्यानंतर ठाकरेंनीही नाशिकपासून अंतर राखले होते. मात्र, आता पुन्हा अमित ठाकरे नाशिकमध्ये सक्रिय झाले असून, मंगळवारपासून ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.
 
दरम्यान दोन महिन्यांनंतर युवा नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून दोन दिवस ते संघटन बांधणीवर विशेष लक्ष देणार आहे.
 
सकाळी साडेदहा वाजता त्यांचे नाशिकला आगमन झाल्यावर अकरा वाजेपासून ठक्कर बाजार येथील पक्षाच्या कार्यालयात ते दिवसभर पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे तर दुसऱ्या दिवशी देखील असाच कार्यक्रम राहणार आहे. त्यामुळे कोणाला प्रमोशन मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती