दाऊदच्या खेडमधील ३ मालमत्तांचा लिलाव

शनिवार, 6 जानेवारी 2024 (09:57 IST)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडममधील संपत्तीचा लिलाव झाला. या लिलावात दाऊदचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरीतील खेड तालुक्यातील बंगले आणि आंब्याच्या बागा यांचा समावेश आहे. याआधी दाऊदच्या मुंबईतील काही मालमत्तांचा लिलाव झाला होता. त्यानंतर आताच्या यादीत रत्नागिरी येथील मालमत्तेचा समावेश आहे.
 
स्मगलर्स फॉरेन एक्स्चेंज मॅन्यूपुलेटर्स अंतर्गत दाऊदची संपत्ती जप्त करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात मुंबके गावात दाऊदची ही संपत्ती आहे. दाऊदचे बालपणीचे घर आणि त्याच्या कुटुंबाच्या तीन संपत्तींचा यात समावेश आहे. दाऊदच्या आईच्या नावावरील रजिस्टर संपत्ती ४ वर्षापूर्वी जप्त केली. या सगळ््या प्रॉपर्टीची किंमत १९ लाखांच्या आसपास होती. दाऊदच्या चारही संपत्तीच्या लिलावाला आज दुपारी २ वाजता सुरुवात झाली. बंद लिफाफे उघडून लिलावाला सुरुवात करण्यात आली. आयकर भवनात हा लिलाव करण्यात आला. उच्च बोली लावणा-याला दाऊदची मालमत्ता मिळणार होती. या चारही मालमत्ता खेडमधील आहेत.

Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती