राज्यातील आशा स्वयंसेविकांना सध्या राज्य सरकारकडून पाच हजार तर केंद्र सरकारकडून तीन हजार रुपये दरमहा मानधन मिळते. याशिवाय कामाच्या स्वरूपात अन्य मोबदला दिला जातो. या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी मध्यंतरी आझाद मैदानात आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत वित्त मंत्री अजित पवार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे जहीर केले होते. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपयांची वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे त्यांना आता मासिक 13 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे.