मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आता 'अहिल्या नगर' म्हणून ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने बुधवारी ही घोषणा केली. जिल्ह्याच्या नावाव्यतिरिक्त सरकारने मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावेही बदलली आहेत.
तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे देण्यात आले. या निर्णया बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला असून उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले “राज्य सरकारचा हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.