बाप्परे, शरिराला चिकटत आहेत लोखंड, स्टील आणि नाणी

गुरूवार, 10 जून 2021 (15:57 IST)
नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद सोनार यांनी ९ मार्चला करोनाची लस घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नीसी सोबत होत्या. यानंतर २ जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांच्या मुलाने टीव्हीवर एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी साहित्य चिकटत असल्याचं पाहिलं होतं. म्हणून त्याने घरी आई-वडिलांवर प्रयोग करुन पाहिला असता वडिलांच्या शरिराला लोखंड, स्टील आणि नाणी चिकटत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने तात्काळ खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
 
नाशिक महापालिकेने या घटनेची दखल घेतली असून आरोग्य पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. अरविंद सोनार यांची तपासणी केली जात असून नेमका काय प्रकार आहे याची पाहणी केली जात आहे. वेळ पडल्यास त्यांच्या रक्ताची तपासणीही केली जाणार आहे.
 
“अरविंद सोनार यांनी सरकारी दवाखान्यात पहिली लस घेतली होती. ९० दिवसांनी अपोलो रुग्णालयात त्यांनी दुसरी लस घेतली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर स्टील वैगेरे वस्तू चिकटत आहेत. त्यांची तपासणी केल्यानंतर हे नेमकं कशामुळे होत आहे हे स्पष्ट होईल. आतापर्यंत साडे तीन लाखांहून जास्त लोकांना लस देण्यात आली असून इतर व्याधींमुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता कमी आहे,” असं पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती