उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 3 पक्ष अधिक जोमाने एकत्र काम करतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, "सरकार पडण्याबद्दल अनेकांनी आडाखे बांधले आहेत. पण मला एवढचं सांगायचं आहे की, हे सरकार टिकेल. पुढची 5 वर्षं काम करेल. हे सरकार नुसतं 5 वर्षं नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमानं एकत्र काम करून सामान्य जनतेचं प्रभावीपणानं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही."
शरप पवारांच्या भाषणातील मुद्दे-
देशात अनेक पक्ष आले आणि गेले. काही लोकं गेल्यामुळे नवीन लोकं तयार झाले. राजकारणात सतत नव्या पिढीने काम करत राहीलं पाहीजे. राष्ट्रवादीमध्ये ही नवी पिढी तयार होतेय. त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही करतोय.
हे सरकार महिनाभर टिकेल, या आठवड्यात पडेल, वर्षभरात पडेल असं बोललं गेलं. पण हे सरकार टिकेल, पाच वर्षे काम करेल याबाबत कोणतीही शंका घेण्याची गरज नाही.