इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठी आज पासून अर्ज सुरु

बुधवार, 22 मे 2024 (21:30 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी 21 मे रोजी ऑनलाईन जाहीर केला. अनेक विद्यार्थी मिळालेल्या गुणांबाबत पुनर्मूल्यांकन करण्याचे इच्छुक असतात. त्यासाठ उत्तर पत्रिकेची छायाप्रत असणे बंधनकारक असते. उत्तरपुस्तिकेच्या पुनर्मूल्यांकन करण्याबाबतची प्रक्रिया आज बुधवार पासून सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 5 जून पर्यत सुरु असणार. 
 
राज्यातील नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, वाणिज्य, कला, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय या शाखेसाठी  14 लाख ३३ हजार 371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 23 हाजर 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा निकाल 93.37 टक्के लागला असून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रति, पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकार करण्यात येतंय. त्यासाठी विद्यार्थ्यांनी  http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती, अटी सूचना वाचून घ्यावात. या साठी विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर जाऊन उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करावे लागणार. गुंपडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे. 
 
उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत असणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात पुनर्मुल्यांकन करण्यासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी प्रती विषय 300 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.
उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती ई मेल, हस्तपोहोच आणि रजिस्टर पोस्टाने अशा तीनपैकी एका माध्यमातून घेता येतील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रती विषय 40 रुपये शुल्क मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागेल.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती