मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १० मार्च रोजी विरार पश्चिमेतील बॉलिंग नानभट रोडवरील गंगूबाई अपार्टमेंटमध्ये घडली. संबंधित शिक्षक उत्तरपत्रिका घरी घेऊन गेले होते. पण, सोमवारी अचानक घरात आग लागली आणि आगीत उत्तर पत्रिकेचा संपूर्ण गठ्ठा जळून खाक झाला. या घटनेचा विद्यार्थ्यांच्या निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे, असा प्रश्न उपस्थित होत आहे की बारावीचा पेपर शाळेतच तपासणे बंधनकारक असताना शिक्षक पेपर घरी कसा घेऊन जाऊ शकतात.
शिक्षण मंडळाच्या नियमांनुसार, परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, शाळेत उत्तरपत्रिका सुरक्षितपणे तपासण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या आणि तिच्यावर काही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तरपत्रिका जाळल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य आता अंधारात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालक आता या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी करत आहे.