केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे

गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (08:38 IST)
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने वरळीतून नाट्यमयरित्या ताब्यात घेतलं. 20 मिनिटांच्या चौकशीनंतर गौरव चतुर्वेदी यांना सोडण्यात आलं. 
 
दरम्यान, या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'या देशात कायद्याचे राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे', असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 
 
अनिल देशमुख यांची मुलगी, सुन, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा - बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील आणि जावई यांना ताब्यात घेतलं आणि सोबत घेऊन गेले. याबाबत कुठलीही माहिती मुलीला किंवा त्यांच्या सुनेला दिलेली नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही त्यामुळे सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती