वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी, चार जणांना अटक

बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (23:30 IST)
वाघाचे नखं,अवयव आणि इतर वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी नागपूर वनविभागानं गेल्या दोन दिवसात चार जणांना अटक केली आहे.अगोदर नागपूर बुटीबोरी येथे कारवाई करत वनविगाच्या पथकानं दोघांना जेरबंद केले.त्यानंतर नागपूर वनविभागाने चंद्रपूर वनविभागाच्या मदतीनं पांचगाव येथून दोघांना ताब्यात घेतले. दोन दिवसांच्या या कारवाईनं नागपूर वनविभागानं या चार आरोपींकडून वाघाचे हाड, मिश्या, वाघाचे दात, कातडाचे तुकडे, मोराचे पाय व नखे, घुबडाचे पाय, मोराचे पिस, विषारी झाडांच्या बिया आणि शिकारीसाठी वापरण्यात येणार साहित्या जप्त केले आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, महाराष्ट्र वन विभागानं गेल्या आठ दिवसात वन्य प्राणी आणि त्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी 18 जणांना अटक केली आहे.              
 
बुटीबोरी वनपरिक्षेत्र कार्यलयानं 29 ताऱखेला गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचत वाघाच्या 7 नखांसह महादेव आडकु टेकाम ,गोकुळदास पवार ताब्यात घेतले होते.त्यांची चौकशी केल्यानंतर चंद्रपूर वनविभागासोबत कारवाई करत पांचगाव येथून रामचंद्र आलाम, विजय लक्ष्मण आलाम यांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या घरांची झडती घेतली असता वनविभागाच्या पथकाला  त्यांच्याकडे  वाघाचे हाड, मिश्या, वाघाचे दात, वाघाच्या कातडाचे तुकडे, मोराचे पाय व नखे, घुबडाचे पाय, मोराचे पिस,  विषारी झाडांच्या बिया आणि शिकारीसाठी वापरण्यात येणार साहित्या आढळून आले.या आरोपींनी एका वाघाची शिकार केल्याचीही कबूली दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती