चिमुकल्याने गिळल्या चाव्या

शुक्रवार, 25 मार्च 2022 (16:16 IST)
बारामती :  आरुष अतुल गुणवरे (वय १८ महिने) असे या बालकाचे नाव असून त्याने चाव्यांचा जुडगा गिळल्यानंतर त्याला तातडिने बालरुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अत्यवस्थ अवस्थेत येथील श्रीपाल रुग्णालयात आणण्यात आले. आरुषला रुग्णालयात आणल्यावर त्याच्या तोंडातून रक्त आणि लाळ बाहेर येत होती. त्याचा जीव गुदमरण्यास सुरवात झाली होती. डॉ.राजेंद्र मुथा, डॉ.सौरभ मुथा यांनी परीस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने उपचार सुरु केले.
 
त्याने गिळलेला चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वासनलीकेच्या वरील बाजूस अडकल्याचे डॉ. मुथा यांनी केलेल्या तपासणीत दिसून आले. त्यानंतर डॉ. मुथा यांनी तातडीने कान नाक घशाचे डॉ. वैभव मदने, भुलतज्ञ डॉ.अमर पवार यांना संपर्क साधत हा प्रकार सांगितले. त्यानंतर दोघ्या डॉक्टरांंनी मिळून आरुषला भुल देत दुर्बिणीद्वारे ‘ब्रॉन्कोस्कोपी’करीत चाव्यांचा जुडगा काढण्यात आला. अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी यशस्वी उपचार दिल्याने आरुषला जीवदान मिळाले.
 
डॉ राजेंद्र मुथा यांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला पालकांना दिला आहे. लहान मुलांपासुन लोखंडी,टोकदार वस्तु, केमिकल,औषधे, आदी दुर ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती