'मंदिरात गेले तर म्हणायचं का गेले, नाही गेले तर नास्तिक'-अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली

रविवार, 29 मे 2022 (10:51 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील दगडुशेठ हलवाई मंदिर गणपतीचं बाहेरुन दर्शन घेतलं होतं. त्यावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. शुक्रवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर गणपतीचं बाहेरूच दर्शन घेतलं. यानंतर यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शुक्रवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ते दर्शन घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांनी मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतलं. दरम्यान, त्यांना मांसाहार केल्यानं ते मंदिरात गेले नसल्याचं पुण्याच्या शहराध्यक्षांकडून सांगण्यात आलं.यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
"प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. मंदिरात गेले तर म्हणायचं, का गेले. नाही गेले तर म्हणायचं हे नास्तिक आहेत. हे तुम्ही दाखवायचं बंद केलं तर बोलणारेही बंद होतील, असलं बोलणाऱ्यांवर तुम्हीच बॅन आणला पाहिजे," असं पवार प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती