मिळालेल्या माहितीनुसार चार दिवसांच्या मोहिमेत, बीएमसीच्या परवाना विभागाने रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदेशीर स्टॉलवरून ९४३ किलोहून अधिक फटाके जप्त केले, ज्यामध्ये अंधेरी पश्चिम, डोंगरी, चेंबूर ०आणि कुर्ला सारख्या भागात मोठ्या प्रमाणात जप्त केले गेले.
नियमांना न जुमानता, मुंबईतील विविध भागात रस्त्यांवर आणि पदपथांवर बेकायदेशीर फटाक्यांची दुकाने सुरू असल्याचे आढळून आले आहे. परवाना विभागाच्या वॉर्ड-स्तरीय पथके वैध परवान्याशिवाय विक्री करणाऱ्या किंवा जास्त प्रमाणात फटाके साठवणाऱ्या विक्रेत्यांची चौकशी करत आहे.