गेल्या चार वर्षापासून गुंडाळून ठेवलेल्या सीएए कायद्याला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून अधिसूचना जारी करून मान्यता देण्यात आल्यानंतर आता देशामध्ये पुन्हा एकदा रणकंदन माजले आहे. या मुद्द्यावरून विशेष करून मुस्लिम समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मुस्लिम समाजाला समजावण्याची जबाबदारी अजित पवार गटाकडे देण्यात आली आहे.
अजित पवार गटाकडून थेट दिल्लीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. या इफ्तार पार्टीमध्ये मुस्लिम समाजाला सीए कायद्याबद्दल अजित पवार गट समजावून सांगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये मुस्लिम समाजातील गणमान्य विविध व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. दिल्लीमधील इंडियन इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये अजित पवार उपस्थित राहतील. यावेळी नागरिकत्व कायदा सुधारणा कायद्यावरचर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.