घरात काही शुभ कार्य असले की घरांत आनंदाचा पारावर नसतो.आणि लग्न असेल तर काहीही विचारायला नको. घरात पाहुण्यांची वर्दळ, गोंगाट गोंधळ सुरूच असतो. नाच गाणं मस्ती घरात आनंद पसरतो. घरात लग्न असेल तर डान्स होतोच. सध्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका आजीबाईने डान्स केला आहे विशेष म्हणजे डान्स करताना आजीबाईंच्या डोक्यावरून पदर पडला नाही. आजी आपल्या नातीच्या लग्नात डान्स करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.